• Sat. Sep 19th, 2026

Amravati BJP: अमरावतीत भाजप नेत्यांमध्ये वादाची ठिणगी; नवनीत राणांच्या वक्तव्यानं Anil Bonde यांचे समर्थक आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, अमरावती:भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद अधिकच वाढू लागला आहे. राणा यांच्या निषेधासाठी डॉ. बोंडे यांच्या समर्थकांनी मेळावा आयोजित केला. नंतर तो स्थगित करण्यात आला असला तरी भाजपमधील स्थानिक नेत्यांशी राणा दाम्पत्याची राजकीय दरी दिवसेंदिवस रुंदावत चालल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

वरुड येथे आमदार चंदू यावलकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात बोलताना नवनीत राणा यांनी ‘अमरावतीत येऊन घाणेरडे राजकारण कोण करते?’ असा सवाल केला. त्याचबरोबर ‘माजींना आता स्थान नाही’ या आशयाच्या वक्तव्याने त्यांनी डॉ. बोंडे यांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली.

हॉटेलमध्ये तपासणी करत असताना धक्कादायक प्रकार उघडकीस; FDA च्या तपासणीत फुटले बनवेगिरीचे बिंगराणा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना मांडण्यासाठी वरूडमध्ये बोंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी मोठ्या संख्येने कार्यकर्ते अमरावतीत दाखल झाले. जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे यांच्यासह प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि दिनेश सुर्यवंशी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. स्थानिक नेत्यांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा आक्रमक सूर या चर्चेत उमटला.

या नाराजीची तीव्रता लक्षात घेत जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी हस्तक्षेप केला. पक्षाच्या दृष्टीने हा प्रकार योग्य नसून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर वरूडमधील नियोजित मेळावा स्थगित करण्यात आला. त्यामुळे तात्पुरता संघर्ष टळला असला तरी राणा दाम्पत्य आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वातील वाढती दरी नेमकी कशी भरून निघणार हा मूळ प्रश्न मात्र कायम आहे.

Maharashtra TimesDisha Salian Case : ‘चारित्र्य हनन करणं बस्स करा’; दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरे संतापले, नको नको ते बोलले‘महायुती’तील दरी रुंदावली

गेल्या काही काळापासून राणा दाम्पत्य आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार रवी राणा यांनी तिवसा येथील भाजप आमदार राजेश वानखडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. आगामी निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हेच तिवस्याचे आमदार असतील, असा दावा करून त्यांनी थेट पक्षाच्या अधिकृत आमदारालाच आव्हान दिले होते. त्यावेळी वानखडे आणि आमदार प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणा दाम्पत्याकडून स्थानिक भाजप नेत्यांनाच पराभवासाठी जबाबदार धरले जात आहे. एकेकाळी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांच्याशी आता निर्माण झालेली दरी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि राणा दाम्पत्यामधील हा भडका शांत करणे पक्षश्रेष्ठींसाठी मोठे आव्हान असणार आहे.

सूर्य आणि काजवे

वरुड येथील दहीहंडीच्या वादानंतर भाजपचे स्थानिक नेते आक्रमक झालेले असतानाच, नवनीत राणा यांनी समाजमाध्यमांवर एक रिल शेअर केली. या रिलमध्ये त्यांनी स्वत:ची तुलना ‘सूर्याशी’ तर विरोधकांची तुलना ‘काजव्यांशी’ केली आहे. विरोधक आपल्याला संपवू शकतील असा त्यांचा भ्रम आहे, परंतु काजवे कधीही सूर्याचे अस्तित्व संपवू शकत नाहीत, असा थेट व बोचरा संदेश त्यांनी या रिलद्वारे अंतर्गत विरोधकांना दिला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया वॉरमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed