Buldhana Teachers Assaulted Students Mother: बुलढाण्यात दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली आहे.
आम्हाला खूष कर, शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईकडे मागणी
आम्ही तुझ्या मुलाला चांगले मार्क देतो तू, आम्हाला खूष कर, अशी अश्लील मागणी या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईकडे केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेमध्ये शिक्षक आणि त्याचा सहकारी असे दोन शिक्षक सहभागी असल्याचे समोर येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Ratnagiri News: लाटेची धडक अन् हात सुटला, लाईफ जॅकेट असूनही गणपतीपुळेच्या समुद्रात कोल्हापूरचा पर्यटक बुडाला
नेमकं काय घडलं?
बुलढाण्याच्या मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांवर 34 वर्षीय पीडित महिलेलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तुझ्या मुलाला चांगले गुण देऊ, असं आमिष दाखवत या दोघांनी पीडित महिलेवर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर, त्या दोघांना खूष ठेवले नाही तर तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा या शिक्षकांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वर्गशिक्षक समाधान इंगळे व सहकारी शिक्षक अनिल थाटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांना अटक केली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षकी पेशाला मान खाली घालायला लावणारी ही घटना असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

