• Thu. Sep 17th, 2026

Mumbai Crime News : मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुंबई टिंडरवर ओळख दोन बहि‍णींवर अत्याचार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : डेटिंग ॲपद्वारे ओळख करून घेऊन तरुणींना जाळ्यात ओढायचं आणि त्यांची फसवणूक करण्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. टिंडर या डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर भेटीसाठी बोलावलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर सीवूड्स येथील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पीडित दोन बहिणींपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींची काही दिवसांपूर्वी टिंडर ॲपद्वारे दोन अनोळखी तरुणांशी ओळख झाली होती. काही दिवस त्यांच्यात चॅटिंग सुरू होती. संशयित तरुणांनी या दोन्ही बहिणींचा विश्वास संपादन करून त्यांना भेटीसाठी नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात बोलावलं. मुलींना यायचा त्रास नको व्हायला म्हणून यासाठी आरोपींनी स्वतः ऑनलाईन टॅक्सी बुक करून दिली होती. टॅक्सीने सीवूड्स येथे पोहोचल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना परिसरातील एका मॉलमध्ये आणि इतर ठिकाणी फिरवलं.

Maharashtra TimesNavi Mumbai Crime : क्षुल्लक कारणावरुन जोरदार भांडण, क्षणात वाद चिघळला, भररस्त्यात तरुणाला संपवलं; नवी मुंबईत खळबळ

बळजबरीने बीअर पाजली

फिरत असताना आरोपींनी दोन्ही बहिणींना एका ठिकाणी नेऊन बळजबरीने बीअर पाजली. दोन्ही मुली मद्यधुंद झाल्यानंतर, ‘थोड्या वेळ विश्रांती घेऊ’ असा बहाणा करून आरोपींनी त्यांना सीवूड्स येथील एका हॉटेलमध्ये नेलं. तेथे मुलींच्या असहायतेचा फायदा घेत आरोपींनीमध्यरात्रीच्या सुमारास दोघांवरही अत्याचार केले.

घरी पोहोचताच पालकांना घडलेला प्रकार सांगितला

घटनेनंतर सुटका झालेल्या दोन्ही बहिणींनी घरी पोहोचताच पालकांना घडलेला गंभीर प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही बहिणींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. सध्या एनआरआय सागरी पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी मॉल आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. तसेच आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाईन टॅक्सीच्या तपशीलावरून त्यांचा माग काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Maharashtra TimesMumbai Local: ऐन गणेशोत्सवात रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे खरेदीदारांचे हाल, टीसीही गायब असल्याने नागरिकांना मनस्ताप

अल्पवयीन असतानाही हॉटेलमध्ये प्रवेश कसा?

पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन असतानाही तिला हॉटेलमध्ये प्रवेश कसा देण्यात आला? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. नियमांनुसार ओळखपत्राची पडताळणी करणं बंधनकारक असताना हॉटेल व्यवस्थापनानं यात हलगर्जीपणा केला का? याचीही पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हॉटेलमधील नोंदी आणि व्यवस्थापनाची भूमिका तपासून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे वृत्त दैनिकाने दिलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा