• Wed. Sep 16th, 2026

Nashik Accident: पाइपला धडकून नाशिकमध्ये तरुणाचा करुण अंत; एक जखमी, बॉडी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आणून नातेवाइकांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान सुरक्षेच्या उपायांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. कृषिनगरकडून तिबेटीयन मार्केटमार्गे सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात सिद्धार्थ दत्तात्रय गोरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी मृतदेह थेट महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवत तीव्र आंदोलन केले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Nashik Traffic Update: नाशिकमध्ये एसटी बसच्या मार्गांत बदल; पोलिसांची अधिसूचना, द्वारकासह मुंबई नाकावरुन वाहतूक वळवली, कसे आहे नियोजन?शनिवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धार्थनगर येथील कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ हा अपघात घडला. सिद्धार्थ दत्तात्रय गोरे (वय ३३, रा. साई सिद्धी रो-हाउस, अंबड; मूळ रा. उपेंद्रनगर) हे गंगापूर रोडवरील रुग्णालयात कार्यरत होते. काम आटोपून ते मित्र मनोज सूर्यवंशी यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १५ एचबी ३०३५) घरी परतत होते. सिद्धार्थनगर परिसरात भूमिगत पाइपलाइनचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यासाठी लोखंडी पाइप रस्त्यावर आडवा टाकला होता. जोरदार पावसामुळे व कमी प्रकाशामुळे गोरे यांना रस्त्यातील अडथळा दिसला नाही. दुचाकी थेट पाइपवर आदळल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला. स्थानिकांनी तत्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी (दि. १३) पहाटे अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान सिद्धार्थ यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची आणि दोन वर्षांची अशा दोन लहान मुली असा परिवार आहे.

Maharashtra TimesNashik Crime : देशसेवेच्या स्वप्नाने सैन्यात भरती, २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने अकस्मात आयुष्य संपवलं, नाशकात खळबळमहापालिकेबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

शवविच्छेदनानंतर संतप्त नातेवाइकांनी सिद्धार्थ गोरे यांचा मृतदेह थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवन प्रवेशद्वारावर आणला. ‘न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलवणार नाही’, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी ठिय्या दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पतकी, गजेंद्र पाटील, राकेश चौधरी, श्रीनिवास देशमुख यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. नातलगांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महिला नातलगांनी राजीव गांधी भवनासमोर रास्ता रोको केला. त्यात सिद्धार्थ यांची आई, पत्नी आणि लहान मुलीसह इतर नातलगांचा समावेश होता. ‘लेखी आश्वासन मिळेपर्यंत हलणार नाही’, अशी ठाम भूमिका नातलगांनी घेतल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली.

स्थानिक लोकप्रतिनिधी प्रियंका दोंदे, किरण राजवाडे, प्रशांत खरात, प्रतिभा पवार आणि राकेश दोंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नातेवाइकांच्या मागण्या महापालिका प्रशासनापुढे मांडल्या. महापालिकेचे शहर अभियंता अजय अग्रवाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे, बाधित कुटुंबातील एका सदस्याला मानधनावर सेवेत घेण्याबाबत कार्यवाही करणे आणि आर्थिक मदतीबाबत प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सायंकाळपर्यंत गंगापूर पोलिसांत संशयित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सिद्धार्थनगर येथे अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाच्या कायदेशीर वारसास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व नाशिक महापालिकेच्या प्रचलित नियमांनुसार रितसर नुकसानभरपाई देण्याबाबत उचित कार्यवाही करणेत येईल. दरम्यान, संबंधित ठिकाणी रस्ता बंद करून पाइपलाइनचे काम सुरू असून, सुरक्षिततेसाठी पाइपला रिफ्लेक्टर लावले होते, असा दावा महापालिकेने केला आहे. अपघातग्रस्त दुचाकीची अवस्था पाहता ती भरधाव वेगात असल्याचे दिसते. तसेच रस्ता बंद असल्याची सूचना ५० मीटर अंतरावर लावली होती. सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याची कार्यवाही सुरू अाहे, असेही पालिकेने स्पष्ट केले.

Maharashtra TimesNashik News : समृद्धी महामार्गावरील अपघातात 21 वर्षांचा तेजस ब्रेन डेड, अनावर दुःखातही गायकवाडांचा मोठा निर्णय, मुंबईपर्यंत एअर ग्रीन कॉरिडोरनियमानुसार नुकसानभरपाई

पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी यश मेडिकल परिसरात हा अपघात झाला. पाथर्डी गावात राहणारे सुनील केशव पगारे हे दुचाकीवरून घरी जात होते. रस्त्यावरील खड्डा चुकवण्यासाठी त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पगारे यांचा जागीच मृत्यू झाला. पगारे हे एका हॉटेलमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, १३ वर्षांचा मुलगा आणि १७ वर्षांची मुलगी आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed