• Wed. Apr 23rd, 2025 9:03:32 AM
    ठाण्यातील भररस्त्यावर पोहोचलं हरीण, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं; पाण्यासाठी वन्यजीवाची परवड

    Deer on Thane Ghodbunder Road : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे एका हरणाचं दर्शन झालं. एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये ते अडकलं होतं. त्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विनित जांगळे, ठाणे : भर नागरी वस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या हरणाची वनविभाग आणि वन्यजीव संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुखरूप सुटका केल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. या हरणाला कोणतीही दुखापत न झाल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या घटनेमुळे ठाण्यात नागरी वस्तीमध्ये आढळून येणारे वन्यजीव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

    ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेलं हरीण

    घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉल नजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. या माहितीनुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी तसेच वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोशिएनचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी याठिकाणी अडकलेल्या हरणाला सुखरूपरित्या ताब्यात घेतले. वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून या हरणाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
    Thane News : येऊरच्या रस्त्यावर दोन बिबट्यांचा मुक्त संचार, सीसीटीव्हीमध्ये दर्शन; वनविभागाकडून जनजागृतीचे फलक

    दोन-तीन दिवसांपासून दर्शन

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे हरण या परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागात त्याचे दर्शन झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोशिएनचे स्वयंसेवक ओंकार कोळेकर यांनी सांगितले. मादी जातीच्या या हरणाला कोणतीही दुखापत झाली नसून अन्नाच्या अथवा पाण्याच्या शोधात ते याठिकाणी आल्याचा अंदाज कोळेकर यांनी व्यक्त केला.
    Thane News : ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम

    Thane News : ठाण्यातील भररस्त्यावर पोहोचलं हरीण, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं; पाण्यासाठी वन्यजीवाची परवड?

    दरम्यान, घोडबंदर रोड या भागाच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण भाग आहे. तर घोडबंदर भागात दुसऱ्या बाजूला खाडी किनारा आहे. मागील काही काळात घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. घोडबंदरच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांचा अधिवास आहे. त्यामुळे अनेकदा या भागात बिबट्यांसह इतर प्राण्यांचा मुक्त संचार होत असल्याचं समोर आलं आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी हे प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर शहरी लोकवस्तीत येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed