• Thu. Apr 24th, 2025 2:49:49 AM
    धावत्या एसटी बसला अचानक आग; सोलापुरात बर्निंग बसचा थरार; भीषण घटनेत सुदैवाने…

    Solapur News : धावत्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतल्याने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला आहे. कुर्डुवाडी ते अक्कलकोट व्हाया सोलापूर या बसने पेट घेतला होता.

    Lipi

    सोलापूर : धावत्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतल्याने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला आहे. कुर्डुवाडी ते अक्कलकोट व्हाया सोलापूर या बसने पेट घेतला होता. सोलापूरहुन अक्कलकोटकडे जाताना एसटी बसला कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे आग लागली. बसमध्ये ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सुचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

    द बर्निंग बसचा थरार

    कुर्डवाडीहुन अक्कलकोटकडे निघालेली बस सोलापूरला बस आली. सोलापूरहुन अक्कलकोट जाणारी एसटी (क्रमांक एम एच 20 बी एल 4215) ही कुंभारी टोलनाक्याजवळ पोहचली. अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. बसमध्ये बसलेल्या ४५ ते ५० प्रवाशांनी ताबडतोब बसमधून खाली उतरले. चालकाने माहिती देत सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्ररूप धारण केले. सोमवारी सायंकाळी सोलापूर अक्कलकोट महामार्गावर द बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला.
    Thane News : ठाण्यातील भररस्त्यावर पोहोचलं हरीण, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं; पाण्यासाठी वन्यजीवाची परवड?

    बसचे लाखो रुपयांचे नुकसान

    अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता आग वाढतच गेली. एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed