Eknath Shinde On Vishal Gawli : कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर आता आरोपी विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केली, या घटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाल गवळी प्रमाणात प्रतिक्रिया दिली आहे.
पहाटे आरोपी विशाल गवळी याने मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपीने शौचालयात टॉवेलने गळफास घेतल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी मोठा संशय व्यक्त करत थेट म्हटले की, ही हत्या आहे. डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी विशाल गवळीने नेले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. यावेळी गुन्ह्यात त्याची पत्नी देखील सहभागी होती.अक्षय शिंदेचा उल्लेख करत विशाल गवळीच्या वकिलांच्या मोठा दावा, व्यक्त केला संशयविशाल गवळीने आत्महत्या केल्यानंतर विविध दावे केली जात आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे म्हणाले की, पोस्टमार्टम होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल. त्यामध्ये दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल. परंतू मी एवढेच सांगेल की, एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. त्याची केस आम्ही फास्ट ट्रॅक चालून त्याला फाशीची सजा व्हायला हवी होती, ही सरकारची भूमिका होती.
आता त्याने आत्महत्या केलीये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबद्दल बोलताना शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड हे म्हणाले की, भर चाैकात त्याला फाशी दिली असती तर आनंदोत्सव साजरा केला असता. जे झाले ते बरे झाले असे सुलभा गायकवाड यांनीही म्हटले आहे. आरोपीच्या वकिलांकडून मोठा दावा केला जातोय. आरोपीच्या वकिलांनी थेट संशय व्यक्त केला आहे.