Jalna News : आमदार नारायण कुचे यांनी जलजीवन मिशन योजनेत जालना जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या ‘हर घर जल हर घर नळ’ योजनेत केंद्र आणि राज्य सरकारचे समान योगदान आहे, मात्र यात गैरव्यवहार झाला आहे.
आमदार नारायण कुचे यांचे मोठे आरोप
पुढे बोलताना नारायण कुचे म्हणाले की, या कामात जे कोणी दोषी ठेकेदार असो की अधिकारी यांना सोडणार नाही, त्यांच्यावरती कारवाई नक्की होणार आहे. कोणाची गय केली जाणार नाही. यावेळी कुचे हे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरही बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की, माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचे मी समर्थन करत नाही.
माणिकराव कोकाटेंच्या विधानावर दिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिला आहे. मला वाटते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री त्यांना समज देतील. हा देश शेती प्रधान आहे, शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी पिकवले तर आपण खातो. आपण त्यांचे समर्थन करीत नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा सांभाळून बोले पाहिजे, असेही आमदार नारायण कुचे यांनी म्हटले.
हर घर जल हर घर नळ योजनेत भ्रष्टाचार
पुढे बोलताना नारायण कुचे म्हणाले की, शेतकऱ्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढू आणि स्थानिक सर्वच संस्था आम्ही ताब्यात घेऊ असे नारायण कुचे यांनी म्हटले आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल बोलताना देखील नारायण कुचे हे दिसले. जालना जिल्हाचे पालकमंत्रिपद हे सध्या भाजपाकडे असून पंकजा मुंडे या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.