पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढले
पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात २०२१- २२मध्ये सिझेरियनपेक्षा नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण अधिक होते. या कालावधीत ३५ हजार नॉर्मल, तर २३ हजार सिझेरियन प्रसूती झाल्या. होत्या. मात्र, यानंतर ‘नॉर्मल’च्या तुलनेत ‘सिझेरियन’च्या प्रमाणात वाढ होत गेल्याचे समोर येत आहे. २०२२-२३मध्ये नॉर्मल २८ हजार, तर सिझेरियन २९ हजार, २०२३-२४मध्ये नॉर्मल २९ हजार आणि सिझेरियनच्या ३४ हजार प्रसूती झाल्या. गेल्या १० महिन्यांमध्ये २१ हजार नॉर्मल, तर २६ हजार सिझेरियन प्रसूती झाल्याचे आरोग्य विभागाने सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.