Pune Budhvar Peth Crime News : पुण्यातील बुधवार पेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करत तिला तिच्याच मैत्रिणीने विकलं. पाच महिन्यांनी मुलीने तिथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात जात सर्व काही प्रकार सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवलं. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आणलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवस राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकले.
तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलं. तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसाय जबरदस्तीने करायला लावला.
पाच महिने अत्याचार सहन करूनही तिने योग्य संधी मिळताच ७ एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे वर्ग केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.