Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५

परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर धावणार आहेत. यामुळे मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
स्थानक – कुर्ला ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम – सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील काही लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.