• Thu. Apr 24th, 2025 2:07:57 PM

    रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका

    रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका

    Amit Shah Raigad Visit: शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    shah sawant

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर गेलेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरची माती डोक्याला लावून आपला नेमका शत्रू कोण आहे, हे ओळखावे आणि सत्य बोलण्याची शपथ घ्यावी’ असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांनी लगावला. शहा यांनी देशात अनेक शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे.

    नाशिक दौऱ्यावर असलेल्या सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर टीका केली. देशात कायदा सुव्यवस्था राखली जावी, असे वाटत असेल त्यांनी स्वतःहून चर्चा निर्माण केली पाहिजे. जे गुन्हेगार नाहीत त्यांना शिवाजी महाराज शासन देत नव्हते. परंतु, येथे पळवाटा काढल्या जातात. सीबीआय, ईडीच्या माध्यमातून विरोधकांवर कारवाई केली जाते. रायगडावरून त्यांची चौफेर नजर गेली पाहिजे. शिवाजी महाराजांची लढाई अतिक्रमित आणि घुसखोरांच्या विरोधात होती.
    सासरच्यांना गुंगी देऊन सोन्यासह पसार, नाशिकची ‘लुटेरी दुल्हन’ सापडली, नवीन स्थळाच्या नादात फसली
    स्वराज्यनिर्मितीची लढाई होती असे सांगत, तेव्हाच्या आणि आताच्या स्वराज्याच्या लढाईत मात्र यांचा पक्ष नव्हता, असा चिमटा सावंत यांनी काढला आहे. स्वराज्य मिळाल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागते. परंतु, ‘सबका साथ सबका विकास’ असा डॉयलॉग मारणे सोप्पे असते, अशी टीका त्यांनी भाजप आणि शहा यांच्यावर केली. राणे पितापुत्रांच्या वक्तव्यांची दखल घेऊ नये, असे सांगत बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतांना नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणेंची वक्तव्ये काय होती, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.
    नाशकात एसीबीची मोठी कारवाई; लष्करी जवानांच्या वेतनात लाखोंचा अपहार, १५ संशयितांविरुद्ध गुन्हे, प्रकरण काय?
    वक्फ विधेयकावरून इंडिया आघाडीवर टीका करणाऱ्या विरोधकांवरही सांवत यांनी टीका केली आहे. नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू कुठे हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्या कुबड्यांवरच सरकार उभे असल्याचेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना हुडहुडी आली असेल म्हणून ते रात्री अपरात्री गृहमंत्री शहा यांना भेटत असतील, असा टोलाही त्यांनी मारला.
    हाउज द जोश! ८० वर्षीय तरुणाची बडोदा ते नाशिक धाव; सप्तशृंगीदेवीचे अनोख्या पद्धतीने घेणार दर्शन
    ‘… म्हणून तहव्वर राणा आणला’
    वक्फ सुधारणा विधेयक आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. समितीने सुचविलेल्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. आम्ही विरोध केला असे सांगत, यांनी हिंदूच्या जमिनी लुटल्या, मंदिरांच्या खजिन्यांचे काय झाले, केदारनाथ मंदिरातील सोने कुठे गेले, असा सवाल सावंत यांनी केला. सोने चोरीला गेल्यावर गृहमंत्री काय करतात, असा सवाल करतानाच वक्फविरोधातील आंदोलन झाकण्यासाठी तहव्वूर राणाचा विषय आणल्याचे सावंत म्हणाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात राणा कारस्थानी होता. प्रत्यक्षात तो नव्हता, असे सांगत वक्फविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा विषय बंद व्हावा, यासाठीच त्याला आणल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याच्यामुळे निष्पाप १६६ जणांचा बळी गेले. त्यामुळे त्याला फाशी द्यावी, अशी आमचीही मागणी असल्याचे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed