• Tue. Sep 15th, 2026
हवामान खात्याचा इशारा, ‘या’ भागात अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Weather Forecast : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी दिसतंय. मुळात म्हणजे राज्यात सध्या पावसाला पोषक असे वातावरण आहे. काही भागांमध्ये विजांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. एप्रिल महिना म्हटले की, पारा अधिक चढतो आणि उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसतात. मात्र, यंदा सर्व गणित बिघडतानाच दिसत आहे. एप्रिल महिन्यात आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये सातत्याने पाऊस कोसळताना दिसतोय. काही भागांमध्ये ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्याचेही चित्र आहे.

राज्यात अवकाळीचे ढग कायम

होळीच्या अगोदर राज्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याचे चित्र होते. होळीनंतर पारा वाढणार असल्याचा अंदाज देखील होता. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळी झाली असून राज्यावर कमी हवामानाचा पट्टा निर्माण झालाय आणि पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालंय. यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हा हजेरी लावताना दिसतोय. भारतीय हवामान खात्याकडून आता मोठा इशारा देण्यात आलाय.
Maharashtra Politics : शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार केल्याची चर्चा, रात्री उशिरा ‘सह्याद्री’वर बैठक होणार?हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे. हेच नाही तर काही शहरांमध्ये उन्हाचा तडका वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलीये. एकीकडे पाऊस पडतोय तर विदर्भातील काही भागांमध्ये पारा उच्चांक गाठताना दिसतोय.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अवकाळीचे ढग

लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा या भागांमध्येही आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. मुंबईत सामान्य वातावरण राहणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. ढगाळ वातावरणामुळे हवामानातील उकाडा वाढल्याचेही चित्र आहे. दुसरीकडे चंद्रपूरमध्ये तापमान वाढल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळाले होते.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed