• Wed. Apr 16th, 2025 10:43:56 AM

    Yogesh Kadam : ‘शांत वाटत असलो तरी वेळप्रसंगी रौद्ररूप…’, योगेश कदम यांचं मोठे विधान

    Yogesh Kadam : ‘शांत वाटत असलो तरी वेळप्रसंगी रौद्ररूप…’, योगेश कदम यांचं मोठे विधान

    Yogesh Kadam Big Statement : “जरी शांत वाटत असलो तरीही वेळप्रसंगी रौद्ररूप दाखवायला कमी करणार नाही”, असं मोठे विधान शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे. त्यांनी एका कार्यक्रमात संबंधित वक्तव्य केलं आहे.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा काही ठिकाणी बंद पडण्याची भीती व्यक्त होत असतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदम या शाळा बंद पडू देणार नाही यासाठी सरसावले आहेत. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक एकही शाळा बंद पडू देणार नाही. त्यासाठी वैयक्तिक लक्ष टाकून आवाज उठवेन, जरी शांत वाटत असलो तरीही वेळप्रसंगी रौद्ररूप दाखवायला कमी करणार नाही, असं मोठे विधान शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. स्वागत अध्यक्षीय भाषण करीत असताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी शैक्षणिक क्षेत्राबाबत आपण जागरूक असल्याचे सांगत शिक्षकांना शब्द दिला आहे.

    टप्पा अनुदानासाठी मी विशेष प्रयत्न करीत आहे. विनाअनुदानित शिक्षक बांधवांना अनुदान मिळण्यासाठी आमचे सरकार नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देईल. सरकारची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, लाडक्या बहिणींचा विचार जसे आपले सरकार करीत आहे. तसाच विचार विद्यार्थी आणि शिक्षकांचा देखील करीत आहे, अशा शब्दांत योगेश कदम यांनी उपस्थित शिक्षकांना आश्वस्त केले.

    नवीन संचमान्यतेनुसार कोकणामधील ज्या शाळांना फटका बसणार आहे. त्यावर योग्य उपाययोजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आखल्या जातील. मला तत्काळ मुख्याध्यापक महामंडळाने पत्र द्यावे त्याचा पाठपुरावा करण्याचाही शब्द गृहराज्यमंत्र्यांनी दिला आहे. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील शिक्षण क्षेत्रातील बदलते निर्णय यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर होणारा परिणाम यावर लक्ष वेधून घेत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही सांगितले.

    या कार्यक्रम प्रसंगी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात हे अधिवेशन दोन दिवस होणार आहे. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित, माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, जे.के.पाटील, उपाध्यक्ष सचिन नलावडे, आर.व्ही.पाटील, गोपाल पाटील, डी.एस.घुगरे, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, महामंडळ सहसंपादक रमेश तरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *