Sharad Pawar And Ajit Pawar Meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. आता साताऱ्यात देखील बैठकीला दोघेही सहभागी झाली आहेत. या बैठकीतील एक व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसतोय.
शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला हजर
पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद जवळपास संपला कमी झालाय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना दिसले. अजित पवारांवर शरद पवारांचा पक्ष चोरल्याची टीका केली जाते. काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका बैठकीत शरद पवार आणि अजित पवार भेटले होते. मात्र, काकांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले होते.Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ याला कानफटवणाऱ्याची ओळख पटली, कुस्तीच्या आखाड्यात घुसून मारणारा ‘तो’ नेमका कोण?एकमेकांच्या शेजारी बसले
आता परत एकदा एका बैठकीत अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र झाले. फक्त एकत्रच नाही तर एकमेकांच्या शेजारी देखील बसले. साताऱ्यातील बैठकीत दोघे एकत्र आले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला दोघांनीही हजेरी लावली. दोघांचीही आसनव्यवस्था बाजूलचा होती. आता या बैठकीतील काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, यादरम्यान दोघांमध्ये काही संवाद झाला की, नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये.
शरद पवार सातारा दाैऱ्यावर
शरद पवार हे आज सातारा दाैऱ्यावर आहेत. दुसरीकडे अजित पवार हे अगोदर रायगडावर गेले होते. त्यानंतर ते देखील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला हजर झाले. सुरूवातीला चर्चा होती की, अजित पवार हे बैठकीला हजर राहणार नाहीत. मात्र, त्यांनीही हजेरी लावली. या बैठकीतील एक व्हिडीओ पुढे आला असून शरद पवार आणि अजित पवार हे आजुबाजूला बसल्याचे दिसतंय. शरद पवार फाईल बघताना देखील दिसत आहेत.