राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर…यांचा एक नवीन कारनामा समोर आलं. बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे…यांना कार्यकर्त्यांच्या फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.गणेश पगारे हे सकाळी घरी असताना चौरे नामक कार्यकर्ता त्यांच्याकडे आला.आणि त्या ठिकाणी चौरे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना फोन लावून दिला. यावेळी एका कामाच्या संदर्भात विचारणा करत संदीप क्षीरसागर यांनी गणेश पगारे यांना…शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले असून पोलिस अधीक्षकांकडे लेखी अर्ज करण्यात आला आहे.आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे देखील गणेश पगारे यांनी म्हटले आहे.