जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या एका कंत्राटाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव सध्या एका घटनेची जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणारे राजकीय कार्यकर्ते आज थेट एकमेकांसमोर भिडले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात सुद्धा दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. हा राडा होण्याचं कारण महापालिकेचे एका कंत्राट होतं, अशी माहिती आहे. याच कंत्राटावरुन दोन्ही गटाचे राजकीय कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची माहिती आहे. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे हा वाद नेमका काय आहे? कंत्राटावरुन नेमका काय वाद होता? असे प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या वादावर आता या कार्यकर्त्यांचे नेते मंडळी तरी काही भूमिका मांडणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
जळगाव शहरात राजकीय वाद चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या कंत्राटाच्या वादातून दोन राजकीय गट आमनेसामने आले आणि हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातच दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.
भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेच्या कंत्राटाच्या वादातून दोन गटांमध्ये आधी शहरातील बालाजी पेठ परिसरात हाणामारी झाली होती. यानंतर दोन्ही गट परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तिथेच वाद पुन्हा पेटला आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत जमावाला पांगवले. जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.
दरम्यान, शिवसेनेचे राहुल ठाकरे यांच्या गटासह दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या कंत्राटाच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा