• Sun. Mar 15th, 2026
    Beed Crime : बीडमध्ये घरात झोपलेल्या महिलेला उचलून नेत अत्याचार, नंतर नराधमाने पीडितेला गावच्या चावडीवर बांधलं

    बीडमध्ये अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहितेला घरातून उचलून नेत गावाबाहेर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला गावच्या चावडीवर बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : राज्यात महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका गावात विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही विवाहिता घरात झोपली होती. पण आरोपीने तिला घरातून उचलून गावाबाहेर नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने पीडित महिलेला गावच्या चावडीवरील खांब्याला बांधून ठेवलं. या घटनेचा व्हिडाओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला कोर्टाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात या संपूर्ण घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पीडित महिलेची विचारपूस केली जात आहे. तसेच या प्रकरणात सखोल तपास केला जात आहे.

    नेमकं काय घडलं?

    संबंधित घटना ही बीड जिल्ह्यात पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे. गरम होत असल्याने रात्रीच्या वेळी महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी हा पीडित महिलेच्या घरात शिरला. घरात सर्वजण झोपले होते. आरोपीने घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर नेले. आरोपीने हे कृत्य करत असताना पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिचं तोंड हाताने घट्ट दाबलं. यानंतर आरोपी गावाबाहेर नदीत पीडितेला घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला.

    पीडितेने आरोपीला प्रतिकार करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण तिची शक्ती आरोपीसमोर कमी पडली. या घटनेत पीडिता बेशुद्ध झाली. या घटनेनंतर आरोपीने क्रूरपणाच्या सर्व सीमा पार केल्या. त्याने बेशुद्ध झालेल्या पीडितेला गावाच्या चावडीवर नेलं. तिथे त्याने खांब्याला पीडितेला बांधलं आणि तिथून पसार झाला. पहाटे गावाचे नागरीक चावडीवर आले तेव्हा त्यांनी पीडितेची विचारपूस केली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या घटनेमुळे गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं. घटनेचं गांभीर्य ओळखून कोर्टाने आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच या घटनेप्रकरणी पिंपळनेर पोलीस आणि ‘पिंक’ पथकाकडून सखोल तपास केला जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा