• Wed. Apr 16th, 2025 9:11:03 PM

    पतीने पत्निच्या प्रियकराला मारली घट्ट मिठी, दोघांचा मृत्यू, पत्नीचा प्लॅन फसला

    पतीने पत्निच्या प्रियकराला मारली घट्ट मिठी, दोघांचा मृत्यू, पत्नीचा प्लॅन फसला

    Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या पतीला संपवण्याचा कट रचला. रूपाली आणि गणेश यांचे प्रेमसंबंध होते, ज्यामुळे रूपालीच्या पतीने गणेशला विरोध केला. पतीला गणेशपासून दूर राहण्यास त्याने सांगितले. दोघांनी मिळून थेट पतीचाच काटा काढण्याचे ठरवले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूर : एक अतिशय धक्कादायक घटना पुढे आलीये. प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने एक योजना आखली. मात्र, सर्वकाही उलटे झाले आणि चक्क पती आणि महिलेचा प्रियकर या दोघांचाही मृत्यू झाला. ही हैराण करणारी घटना सोलापूर जिल्हातील बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना महिलेवर संशय आला आणि तिने सर्व घटना सांगितली. त्यानंतर मोठा धक्का बसला. प्रेमात वेड्या प्रियकराने आणि प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढण्याचे ठरवे.

    ढाळे पिपळगाव तलावात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना सुरूवातीलाच संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती पुढे आली. मयत गणेश अनिल सपाटे आणि रूपाली शंकर पटाडे यांच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. प्रियकर गणेश सपाटे आणि रूपाली शंकर पटाडे यांनीच मिळून शंकर पटाडे यांच्या हत्येचा प्लॅन आखला. हे प्रकरण तसे जुनेच आहे.

    रूपाली पटाडे आणि शंकर पटाडे यांचे लव्ह मॅरेज होते. दोघांच्या आयुष्यात सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. मात्र, गणेश याचे रूपालीच्या आयुष्यात आगमन झाले आणि लव्ह मॅरेज केल्यानंतरही ती दुसऱ्यांदा प्रेमात पडली. रूपाली ही घरकाम करत होती. यादरम्यानच तिची ओळख गणेशसोबत झाली. रूपाली आणि गणेशचे नैतिक संबंध सुरु झाले आणि याची कुणकुण तिचा पती शंकर याला लागली. त्याने गणेशपासून दूर राहण्याची रूपालीला बजावून सांगितले.
    Pune News : …तर पोरी, शेतकरी पोराशी लग्न कर! जगतापांची कविता व्हायरल, पुण्याच्या तरुणीचं मन परिवर्तन, आता म्हणते…रूपालीला गणेशला सोडणे शक्य होत नव्हते आणि दुसरीकडे नवरा देखील तिच्यावर दबाव टाकत होता. गणेश आणि रूपालीने मिळून योजना आखली आणि गणेशला कायमचे रस्त्यातून काढून टाकण्याचे ठरवले. 18 फेब्रुवारी 2025 ला शंकरला हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि त्याला भरपूर दारू पाजण्यात आली. गणेशने धाराशिवला जाऊ म्हणत त्याला नेले आणि मध्यरात्रीच पुलावर थांबून डान्स करण्यास दोघांनी सुरूवात केली.

    ठरल्याप्रमाणे गणेशने शंकरला आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि डान्स करण्यास सुरूवात केली. यादरम्यान गणेशने शंकरला थेट पुलावरून खाली फेकले. मात्र, शंकरने गणेशला जोरात मिठी मारली. अनेक प्रयत्न करूनही गणेश स्वत:ची सुटका करू शकला नाही आणि दोघांचाही मृत्यू झाला. रूपालीवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी अधिकची चाैकशी करताच संपूर्ण भांडाफोड झाली.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed