• Sun. Mar 15th, 2026

    ‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान

    ‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान

    लोकसंख्या नियंत्रण आणि तीन अपत्यांच्या भूमिकेवर नरेंद्राचार्य महाराज यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांचं मत मांडलं आहे.

    नरेंद्राचार्य महाराजांचे तीन अपत्यांच्या भूमिकेला समर्थन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : लोकसंख्या नियंत्रण आणि धर्मांतराच्या मुद्द्यांवर भाष्य करताना नरेंद्राचार्य महाराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेल्या “तीन अपत्य” या भूमिकेला समर्थन दिले. छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक विषयांवर आपली भूमिका मांडली. मुस्लिम समाजात मुलं म्हणजे ‘अल्लाहची देण’ असं मानलं जातं, पण हिंदूंनी देशासाठी कुटुंब नियोजन पाळलं. आता हिंदूंची संख्या घटत चालली असून, मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच आहे,” असे विधान रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

    छत्रपती संभाजीनगर येथे एक कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लव्ह जिहाद, लोकसंख्या नियंत्रण आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. लव्ह जिहादवर भाष्य करताना ते म्हणाले की, “हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात.

    मुलींशी लग्न करून त्यांना विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. जर एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या मुलांचा धर्म बदलू नये, अशी तरतूद कायद्यात असायला हवी.”

    Maharashtra TimesBeed Crime : परळीत माणुसकीला काळीमा; 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, महाराष्ट्रात संतापाची लाट, नराधमांचा शोध सुरु

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका

    अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी आरोप केला. “ख्रिश्चन मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरावेळी अंनिस कुठे असते? ही समिती मिशनरींना विकली गेली आहे का? त्यांच्याच पैशावर ही समिती चालते का?” असा सवाल त्यांनी विचारला. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केवळ चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesLPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

    ‘हिंदू व्होट बँकच आहे का?’

    सरकारवर टीका करताना महाराज म्हणाले की, “शाळा-महाविद्यालयात ख्रिश्चन आणि मुस्लिमांचा इतिहास शिकवला जातो, त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. तिथे हिंदूंचा इतिहास का शिकवला जात नाही? मदरशांना आणि ख्रिश्चन शाळांना अनुदान दिले जाते, मग वेद विद्वान शाळांना अनुदान का मिळत नाही? हिंदूंना फक्त ‘व्होट बँक’ म्हणून वापरू नका,” असंही मत त्यांनी यावेळी मांडलं.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा