राजकारणात कायम चर्चेत असलेलं कुटुंब म्हणजे बारामतीचं शरद पवार कुटुंब… आणि आता एकत्र आलंय एका खास गोड क्षणासाठी! होय, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पार पडला, आणि तोही मोठ्या थाटामाटात. पुण्याजवळच्या गोठावडे गावामध्ये पार पडला. अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर हा साखरपुडा समारंभ मोठ्या थाटात पार पडला. जय पवार यांचं लग्न साताऱ्यातील फलटणचे सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत पार पडणार आहे. दरम्यान या समारंभासाठी स्वत: अजित पवार यांचे काका शरद पवार आणि काकू प्रतिभा पवार यांनी उपस्थिती लावली. अजितदादांनी स्वतः गेटवर जाऊन आपले काका शरद पवार आणि काकू प्रतिभाताई यांचं स्वागत केलं… या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी भावी सुनेला हळद, कुंकू लावत भेटवस्तू देत तिचे पवार कुटुंबात स्वागत केले. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. राजकारणाच्या वादळात नेहमी केंद्रस्थानी असणारं पवार कुटुंब…पण या दिवशी, त्या फार्महाऊसवर कोणताही पक्ष नव्हता, कोणतीही स्पर्धा नव्हती, फक्त माणसं होती, आपुलकी होती, आणि एका नव्या सुरुवातीचा गोड क्षण होता… या गोड क्षणाविषयी नेमंक तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करा…