Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानात मोठे बदल होत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर, हवामान खात्याने आता आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, तर तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पारा देखील वाढताना दिसतोय.
अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पार
होळीच्या अगोदर हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा दोनदा इशारा देण्यात आला होता. हेच नाही तर अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याचेही बघायला मिळाले. जळगाव आणि अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. आज हवामान खात्याकडून आठ जिल्हांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय.
Jay Pawar : अजित दादांच्या लेकाचा साखरपुडा, सुप्रिया सुळे सहकुटुंब हजेरी लावणार, दोन कुटुंब जोडणारी ‘ऋतुजा’ कोण?विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा मोठा इशारा
दुसरीकडे तीन जिल्हांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान ढगाळ असल्याने उकाडा वाढण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय. आता गडचिरोली, भंडारा, गोदिंया, अमरावती, वर्धा, नागपूर याठिकाणी वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. तसा इशाराच हवामान खात्याकडून देण्यात आलाय.
राज्यात अवकाळीचे संकट कायम गारपिटीची शक्यता
बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्हांमध्ये रात्रीच्या वेळी उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणात देखील हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे राज्यात बघायला मिळतंय. पाऊस आणि वाढलेली उष्णता सध्या बघायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यात सामान्य वातावरण बघायला मिळाले. सांगली, लातूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. आताही अवकाळीचा इशारा देण्यात आलाय.

