२०२९ मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव केलं होतं.उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले है अस म्हणत त्यांनी हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री होतील असं खैरे म्हणाले.जालना शहरात लग्न समारंभानिमित्त आल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे बोलत होते.