Kudal Police Constable ends life : विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सुरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. ” तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे” असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललं.
तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सुरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. ” तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे” असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे सुरजच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटेच राहत होते.
Jaipur Hit and Run : मद्यधुंद कार चालकाचा कहर, गाड्यांना धडक, बाईक उडवल्या, नऊ जणांना चिरडल्याने खळबळ
सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या मित्राच्या मोबाईलवर ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्यांच्या मळगांव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. सुरज राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॅच लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवल्याचे सुरजने मेसेजवरून सांगितले होते. त्यामुळे भावाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.
Wardha Accident : कार टँकरला धडकली, पोलीस कुटुंबातील चौघं ठार, आई-बापासह चिमुकली लेकरं मृत्युमुखी
त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुकदम यांनी भेट दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, भाऊ, वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे. सुरज पवार यांच्या या जाण्याने कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी सुद्धा याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीने भेट देऊन माहिती घेतली.

