Pune Accident: टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात घडली.
अधोक्षज महेश वहाळे (वय १८ महिने) असे अपघाती मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी टँकरचालक सनी प्यारे बारसकर (वय ३३, सध्या रा. वडाचा गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी, मूळ रा. भय्यावाडी, सहापूर, जि. बैतुल, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सतीश वसंत टिकारे (वय ६५, रा. टिकारे हाइट्स, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणपती माथा परिसरात घडली. या परिसरात राहणाऱ्या छाय वहाळे यांचा नातू अधोक्षज घरासमोर खेळत होता. त्या वेळी शेजारच्या एका इमारतीतील टाकीत पाणी भरण्यासाठी टँकर आला होता. ‘ती’ कृती शोभणारी नाही; दीनानाथ रुग्णालय प्रकरणावरुन मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर
टँकरचालक टॅंकर मागे वळवून असताना अधोक्षज मागच्या चाकाखाली सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने रहिवाशांनी टँकरचालक बारसकरला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. टँकरचालक बारसकर याला अटक केली असून, टैंकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.Uddhav Thackeray: वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
पाण्याच्या टाकीत बुडून बालकाचा मृत्यू
निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून अठरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड परिसरात घडली. रौनक सुनील कनोजे (रा. लालचंद सोसायटी) असे बालकाचे नाव आहे. याबाबत उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्राचा विकास हाच संकल्प; भाजप स्थापनादिनी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
रौनक हा शनिवारी (दि. ५) दुपारी अडीच वाजता लालचंद सोयायटीच्या निर्माणाधीन इमारतीत खेळत होता. त्याचे आई-वडील मजुरीचे काम करीत होते. खेळताना तो सोसायटीच्या पाण्याच्या टाकीजवळ गेला, तेव्हा तोल गेल्याने टाकीत बुडाला. त्याला टाकीतून बाहेर काढून बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.