Sanjay Raut Marathi News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर उभारण्याबाबत केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊतांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका करताना, संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवलेले वक्फ बोर्डाच्या विधेयकाविरोधात शिवसेनेची स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर जमीन हस्तांतरणाचे आरोप केले आणि विविध धर्मांच्या संपत्तीबाबत चिंता व्यक्त केली.
एसंशि (एकनाथ संभाजी शिंदे) यांना इतिहास माहित नसून ते खोटारडे आहेत. ते कधी बेळगावच्या आंदोलनात नव्हते आणि बोलतायेत मी होतो. बाबरीच्या प्रकरणात शिवसेना आघाडीवर होते, मोदी शहा कुठे होते. ते कायम भूमिगत असतात, कुठे ढोकला खात असतात. आम्हाला सांगा ना, माझ्यावर चार्जशीट आहे, मी सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले. ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे’ ही आमची शिवसेनेची घोषणा आहे. हे त्या माणसाला माहित नसेल. मोदी फक्त देश विकायचं काम करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आणि लाख कारसेवकांच्या बलिदानातून हे मंदिर उभारलं आहे. या XXX च्या सहकार्याने नाही उभारलं, जे पळून गेले. असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाचा विषय हा शिवसेनेसाठी संपला आहे. काही लोकं कोर्टात गेलेत, अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की हे विधेयक घटनाबाह्य आणि संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवलं गेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं कायदे तज्ञ्जांचं मत आहे. शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की, भाजपने आणलेल्या विधेयकाविरोधात मतदान केलं. या विधेयकाला कोणाताही धार्मिक आधार नाही. हे विधेयक कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी समान नागरी कायदा, हिंदुत्त्व या संदर्भाशी आसपासही जात नाही. याचा संबंध संपत्तीशी आहे. सरकारमधील काही लोकांना आणि त्यांच्या लाडक्या उद्योगपतींना जमिनी घशात घालायचा असल्याने या जमिनी आणल्याचं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.
खोट्यापेक्षी सत्य कॉपी करायला काही हरकत नाही. आज मुसलमानांची संपत्ती गेली आहे, उद्या ख्रिश्चन, पारशी, जैन संपत्ती जाईल. बुद्धगयावर हक्क सांगतील, चैत्यभूमीच्या बाजूची जमीन आमची म्हणून घेऊन जातील, असंही संजय राऊत म्हणाले.