Ashish Shelar News : आशिष शेलार यांनी अजय-अतुल यांच्या गाण्याचं पहिलं कडवं “लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा” हे कडवं न म्हणता दुसरं कडवं म्हटलं. त्यांच्या या विनोदी आणि सांकेतिक शैलीने उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण झालं.
आशिष शेलार यांच्या या विनोदी आणि सांकेतिक शैलीने उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण झालं. तसेच ठाकरे गटाची निशाणी मशाल असल्याने शेलार यांनी अर्जुन कडवं न बोलण्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू झाली. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना याज्ञवल्क्य संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, कार्यकारी विश्वस्त डॉ. सुरेश एकलहरे आणि समाजसेविका विद्याताई धारप यांचा समावेश होता.Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे मागितली माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
या पुरस्कारांचे वितरण डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार, तसेच संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.” धर्मो रक्षति रक्षितः” आणि “तमसो मा ज्योतिर्गमय” या ब्रीदवाक्यांनी सजलेल्या या समारंभात संस्कृती, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला.Girish Mahajan : महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप, खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, आशिष शेलार यांनी मशाल शब्द असलेलं कडवं टाळल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांच्या या कृतीवर काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे.