उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने त्या भावूक झाल्या. त्यांचे शब्द ऐकून बाजूला बसलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू अनावर झाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत भाषण केलं. राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा जाहीर केल्या. राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलत असताना सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या. सुनेत्रा पवार या भावूक असतानाही बोलत राहिल्या. त्यांचे शब्द ऐकून बाजूला बसलेल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू अनावर झाले. सभागृहात अत्यंत शांतता यावेळी पसरलेली होती.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्या अर्थसंकल्पात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम केलं होतं”, अशी सुनेत्रा पवार यांनी आठवण काढली आणि त्या भावूक झाल्या. पण तरीही त्यांनी आपलं भाषण पुढे सुरु ठेवलं.
“आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व माता-भगिणींसह, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मी मनापासून शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
“आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर. आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद तडलेली आहे. आजची स्त्री अशाच जिद्दीने संकाटांना सामोरी जात स्वत: चा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करुयात”, असं सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा