मराठा आमदार धनंजय मुंडेंना टार्गेट करत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला होता. सदावर्तेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी प्रत्युत्तर दिले आहे. जातीवादातून नाही तर खंडणीतून देशमुखांची हत्या झाल्याचे सोळंकेंनी पुन्हा स्पष्ट केले. मारेकरी मुंडेंच्या जवळचे असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला असेही ते म्हणाले. म्हणजेच यात मुंडेंना टार्गेट करण्याचं काम झालेलं नाही असे उत्तर सोळंकेंनी दिले.