Chh. Sambhajinagar News : आजूबाई देवीच्या सवारीसाठी दुचाकीने जात असताना ट्रॅक दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांवर काळाचा घाला पडला आहे.
समाधान अवचित आघाडे वय ४१ रा.उपळी सिल्लोड, विकास रामभाऊ सोनवणे वय २५ रा. आन्वा ह.मु.उपळी हे जागीच ठार झाले. तर काशिनाथ गोविंद पांढरे वय ४५ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील तिघे मित्र आजूबाई देवीच्या स्वारीसाठी दरवर्षीप्रमाणे दुचाकीने जात होते. सिल्लोड येथून १२ किलोमीटर अंतरावर गेले. पुलावर जाताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.या भीषण अपघात दुचाकीवरील तिघे दूर फेकले गेले. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काशिनाथ गोविंद पांढरे वय ४५ हे गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेत तीन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अजिंठा पोलीस करत आहेत.