Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी करून जलवाहिनीच्या नागमोडी पद्धतीला आक्षेप घेतला व आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. येत्या आठ दिवसांनी जलवाहिनी सरळ रेषेत टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेक भागांमध्ये बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा
शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीबाणी निर्माण झाली आहे. बहुतेक भागांमध्ये बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्याबद्दल नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. काही नागरिकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात धडक दिली. त्या अगोदर सिडको ‘एन ७’ येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.हॉटेलवर बसला होता, तितक्यात तिघे आले अन्.., बारामतीत दिवसाढवळ्या भयंकर घटना, तिघांना अटक
नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार
पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटण्याचे, निखळण्याच्या प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहराला मिळणाऱ्या वाढीव वीस एमएलडी पाण्याला ब्रेक लागत आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनांमध्येही बिघाड होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी फारोळा नाला येथे निखळलेल्या नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची पाहणी केली. याच ठिकाणी वारंवार जलवाहिनी निखळत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालकमंत्री संजय शिरसाटयांनी अधिकाऱ्यांना दिले मोठे आदेश
जलवाहिनी नागमोडी पद्धीतने (झिकझॅक) टाकण्यात आल्याचे शिरसाट यांच्या लक्षात आले. जलवाहिनी टाकण्याची अशी ही कोणती पद्धत आहे, असा सवाल त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जलवाहिनी सरळ रेषेत व्यवस्थित टाका, असे आदेश त्यांनी दिला. यासाठी किती दिवस लागतील असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. अधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा अवधी लागेल, असे सांगितले. तीन दिवस नाही, आठ दिवस घ्या पण काम व्यवस्थित करा, असा आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न शहरात गंभीर बनलाय.