Maharashtra Weather Forecast : राज्यात अवकाळी पाऊस, वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये आज पावसाचा इशारा असून, कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर अकोल्यामध्ये तापमान ३८ अंशांपेक्षा जास्त नोंदले गेले आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट
कोकणात जरी उष्ण आणि दमट वातावरण राहणार असले तरीही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय. होळीच्या अगोदर पारा चांगलाच वाढताना दिसला. काही शहरांमध्ये तर तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दोन वेळा देण्यात आला होता. होळीनंतर उन्हाचे चटके अधिक तीव्र होतील, असे सांगितले जात होते.पाणीबाणीची ओरड, पालकमंत्री संजय शिरसाट सक्रिय, अधिकाऱ्यांना दिला आठ दिवसांचा वेळकाही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग कायम
प्रत्यक्षात उलट होळीनंतर हवामानात मोठे बदल झाले आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. चक्राकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. राज्यात अनेक ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहणार असल्याचाही अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलाय. अकोल्यामध्ये काल उच्चांकी तापमान होते. अकोल्यात ३८. अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मुंबईत काल सामान्य तापमान होते. मात्र, दुपारनंतर उकाडा वाढला.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट दिलाय. महाबळेश्वरमध्ये काल २८ तापमानाची नोंद झालीये. परभणीमध्ये ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आलीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय. दुसरीकडे नाशिकमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळ बागांचे मोठे नुकसान झाले. यामुळे काही दिवसांपासून शेतकरी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे करत आहेत.