• Wed. Sep 23rd, 2026

राज्यपाल वर्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 11, 2026
राज्यपाल वर्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन – महासंवाद

मुंबई दि. ११ : राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बुधवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे व प्रतीक कांबळे यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत भेट दिली.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे देखील भेट दिली व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, माजी खासदार राहुल शेवाळे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व खजिनदार मंजिरी मराठे उपस्थित होते. स्मारकाच्या वतीने राज्यपालांना सावरकरांची प्रतिमा तसेच सावरकर विषयी ग्रंथ भेट देण्यात आले.

००००

जनसंपर्क अधिकारी/लोकभवन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed