Karuna Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत. मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करुणा मुंडेंनी केला आहे.
‘मोठमोठ्या दिग्दर्शकांनी मला हिरोईनचा रोल ऑफर केला होता. पण त्या सगळ्या ऑफर फेटाळून लावत मी संपूर्ण जीवन माझ्या पतीसोबत घालवलं. एक पत्नी म्हणून माझं कर्तव्य निभावलं. पण आज माझ्या बदनामीचा कट रचला जातोय. कधी मला तुरुंगात पाठवलं जातंय, कधी माझ्या घरी गुंड पाठवले जात आहेत, कधी माझ्या घराबाहेर पोलीस उभे करणं. कधी माझ्या मागे माणूस पाठवणं, अशा गोष्टी करुन मला त्रास दिला जात आहे,’ असा दावा मुंडेंनी केला.Tanisha Bhise Death Case: भावाचे कॉल रेकॉर्ड, त्या दिवसाचे CCTV तपासा; भिसे कुटुंबाचे दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप
‘माझ्याशी लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर देण्यात आलेली आहे. माझा पती धनंजय मुंडे आणि त्याचे दलाल राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर हे सगळे दलाल लोक, जो मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटी रुपये देणार आहेत,’ असा सनसनाटी आरोप करुणा मुंडेंनी केला.
करुणा मुंडे यांच्याकडून कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करण्यात आले. पण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी ते पुरावे फेटाळून लावले. करुणा यांनी सादर केलेली कागदपत्रं खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केला. वसियतनामा, स्वीकृतीपत्रात धनंजय मुंडेंच्या सह्या वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी अंगठा लावलेला आहे, या बाबी सायली सावंत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. करुणा मुंडेंचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे, असाही दावा सावंत यांनी केला.Tanisha Bhise Death Case: ANC चेकअपला आल्या नाहीत, ॲडव्हान्सच्या रागातून तक्रार; मंगेशकर रुग्णालयाकडून स्पष्टीकरण
न्यायालयीन सुनावणीनंतर करुणा मुंडेंनी माध्यमांसमोर येत मीच धनंजय मुंडेंची पहिली बायको असल्याचा दावा केला. माझ्याकडे पुरावे आहेत. धनंजय मुंडे मला सोबत घेऊन जगभर फिरले आहेत. कारण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. तुम्ही त्यांचे पासपोर्ट बघा. माझे व्हिसा लावलेले आहेत. आम्ही अनेक देशांमध्ये फिरुन आलो आहोत. राजश्रीच्या कोणत्याच कर्जात धनंजय गँरेंटर नाही. पण माझ्या कर्जात आहे. राजश्रीसोबत धनंजय मुंडेंसोबत जॉईंट अकाऊंट नाही. पण माझ्यासोबत आहे, असं करुणा मुंडे म्हणाल्या.