राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयीन सुनावणीनंतर माध्यमांसमोर बोलताना करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते.मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करुणा मुंडेंनी केला आहे. माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे. मला विविध मार्गांनी त्रास देण्यात येत आहे, असा दावा करुणा मुंडेंनी केला.