Sanjay Raut on Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात भाजप आमदार अमित गोरखे यांचे PA सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तीव्र पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, गरिबांच्या समस्यांसाठी आवाज उठविण्याची सवय नसल्याचे सांगितले. आरोग्यसेवेतील भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आता विचार करा, भाजपच्या कार्यकर्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रूग्णालयात फोन गेल्याचं सागितलं जातंय तरीही भिसेंच्या कुटुंबावर संकट आली आणि मातेचा करूण अंत झाला. काय करत आहेत देवेंद्र फडणवीस? सरकारला १०० दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेतायेत. मला वाटतं की ही जी गोरगरिबांची कामं आहेत ही फडणवीसांच्या लेव्हलची नाही, त्यांची लेव्हल खूप मोठी आहे. शेतकरी आणि गरिब मंडळी तडफडून मरतायेत. योजना कागदावर आहेत, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला पोपट बांधून फिरतायेत आणि देवेंद्र फडणवीस यांची झेप मोठी आहे. अदाणी, अंबानी, टाटा, बिर्ला आणि मोठेमोठे ठेकेदार यांची कामे होतायेत. कारण त्यांची लेव्हल ती आहे, फडणवीसांना त्यांच्या लेव्हलची कामं सांगितली पाहिजेत. त्यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना गोरगरिबांची काम करायची सवय नाही. भाजपचे कार्यकर्ते तडफडून मरतायेत. आरोग्यसेवेचे धिंडवडे निघालेत. मंत्रालयात बसून दम देणं सोप्प असतं, हे सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये अजारक आणि बजबज माजली आहे. हो मोदींचे भजन करत बसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रामध्ये २० लाख रूपये सामान्य माणूस देऊ शकतो का? माझ्याकडे सगळी माहिती आहे, त्यांच्या तोंडावर माहिकी फेकू शकतो. आम्ही बोललो की मिरच्या झोंबतात, तुमची लेव्हल जरा खाली आणा, गौतम अदानी, अंबानी यांचा हा महाराष्ट्र आहे. भिसे या लोकांनी तुम्हाला मतं दिलीत. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर ज्या डॉक्टरांची भिसे कुटुंब नावे घेईन त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी. तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुरूंगात टाकण्यापुरतीच, ज्या दिवशी सत्ता नसेल तेव्हा रस्त्यावर कावळाही ढुंकून पाहणार नाही. बीडमध्ये जशी कारवाईची नाटकं चालली आहेत. मी स्पष्टपणे सांगतो ज्या बाईंचा मृत्यू झाला त्यांचे तुम्हाला शाप लागतील. आम्ही सामन्य लोकांच्या प्रश्नावर बोलतो, भ्रष्टाचाराने महाराष्ट्र कीडलाय, असंही संजय राऊत म्हणाले.