पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून मंगेशकर रुग्णालयावर टीका केली जातेय. अशातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरेंनी मोठा इशारा दिलाय. रुग्णालयाची ही मस्ती आम्ही उतरवणार असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला. पैशांसाठी रुग्णालयाकडून खून करण्यात आल्याचा आरोप रूपाली पाटलांनी केला.