एकनाथ शिंदे यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांना मस्साजोग येथे घर बांधून दिले जात आहे या घराच्या बांधकामाची पाहणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली.एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मी इथे घराची पाहणी करायला आलो असं योगेश कदम म्हणाले.पावसाळ्याच्या अगोदर या घराचे बांधकाम पूर्ण होणार आहे असंही कदम यांनी सांगितलं.घर भरणीसाठी स्वतः शिंदे साहेब हे उपस्थित राहतील असं कदम म्हणाले.देशमुख कुटुंबांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे आहेत असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं.