• Fri. Mar 6th, 2026
    मंगांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला तीव्र शोक, कुटुंबीयांना दिला मदतीचा हात; ‘आप’ सरकारलाही फटकारले

    Eknath Shinde on Mangatram Manga Murder Case : पंजाबमधील मोगा येथील स्टेडिअम मार्गावर शिवसेना जिल्हाध्यक्षांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. यानंतर पक्षातही खळबळ उडाली आहे. यावर शिवसेनेचे मुख्यनेते तथा एकनाथ शिंदेंनी ट्विट करत मंगांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : पंजाबमधील मोगा येथील स्टेडिअम मार्गावर शिवसेना जिल्हाध्यक्षांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. यानंतर पक्षातही खळबळ उडाली आहे. इंदिरा कॉलनीतील रहिवासी असणारे मंगतराम मंगा गुरुवारी सायंकाळी आपल्या घराकडे निघाले असताना ही घटना घडली. यावर शिवसेनेचे मुख्यनेते तथा एकनाथ शिंदेंनी ट्विट करत मंगांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तर शिंदेंनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे.

    एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब परिसरात मोगा परिसरात आमच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा जी यांची गोळ्या घालून केलेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी आप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘पंजाबमध्ये खलिस्तानी विचारसरणीच्या लोकांनी शिवसैनिकाची उघड हत्या केल्याने तेथील आप सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती उघडकीस आली आहे.’

    ‘आम्ही पंजाबच्या आप सरकारचा तीव्र निषेध करतो. हत्येच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी.’ अशा शब्दांत त्यांनी आप सरकारला घेरले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed