• Tue. Sep 8th, 2026

Suresh Dhas : ‘सतीश भोसलेचं घर पाडणं हे कोणत्या कायद्यात बसतं?’; खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचा सवाल

Suresh Dhas : ‘सतीश भोसलेचं घर पाडणं हे कोणत्या कायद्यात बसतं?’; खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचा सवाल

Suresh Dhas on Satish Bhosale Family : “काही सापडलेलं नसताना, नोटीस देऊन ते घर सीझ करायला हवं होतं. ते घर बंद करायला हवं होतं. ते अशिक्षित आहेत, तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हटल्यावर हे कोणत्या कायद्यात बसतं?”, असा सवाल सुरेश धस यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी आज खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सतीश भोसले याच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला. यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “खोक्या उर्फ सतीश भोसले याला मीडियाने खूप मोठं केलं. पण आता त्याची परिस्थिती बघा. ते 100 वर्षांपासून इथे राहत आहेत. त्याचं घर पाडलं गेलं आहे. मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घरे पाडली आहेत. त्यांनी कोणत्या नियमाने हे केलं आहे त्याची उत्तरे आम्हाला मिळाली तरी बरं होईल”, असं सुरेश धस म्हणाले.

“तो एवढा मोठा नाहीय जेवढा मोठा करुन दाखवला. आता त्याची परिस्थिती काय झाली ते बघाना. आता राहायला घर नाही. जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर 307 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक झाली आहे”, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली.

“काही सापडलेलं नसताना, नोटीस देऊन ते घर सीझ करायला हवं होतं. ते घर बंद करायला हवं होतं. ते अशिक्षित आहेत, तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हटल्यावर हे कोणत्या कायद्यात बसतं?”, असा सवाल सुरेश धस यांनी केला.

“या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी व्हिडीओ पाहिला. बुलढाणा जिल्ह्यातील जो तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती. इथे पीडित ढाकणे आणि सतीश भोसले एकमेकांच्या जवळ राहतात. हे 307 चं प्रकरण होतं. पण घर पाडण्याचं कारण काय? ही कारवाई कुणाच्या प्रेशरने केली तेच आम्ही बघतोय”, असं सुरेश धस म्हणाले.
Sangli News : चंद्रकांत पाटील यांची खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर, काँग्रेसचे निष्ठावंत भाजपमध्ये जाणार?

‘भोसलेच्या विरोधात जी फिर्याद दिली ती रास्त’

सतीश भोसले याच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांची देखील भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याच्या आश्वासन दिले. तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीने केली. भोसलेच्या विरोधात जी फिर्याद दिलेली आहे ती रास्त आहे. त्या फिर्यादी वरती पोलीस काम करत आहेत. त्याला अटक केलेली आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केली. ढाकणे कुटुंबातीन सदस्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून ऑपरेशन करू आणि उर्वरित लागणारा खर्च देखील मी करेन, असं आश्वासन सुरेश धस यांनी दिले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed