• Mon. Apr 14th, 2025 4:33:54 PM
    विधानपरिषदेच्या ३ उमेदवारांची नावं भाजपने केली जाहीर

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Mar 2025, 11:32 am

    BJP Vidhan Parishad candidates: राज्यातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या पाच जागांपैकी ३ जागा भाजप, आणि प्रत्येकी एक एक जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली होती. १० मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आणि उद्या(१७ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानुसार भाजपने आज(१६ मार्च) आपल्या वाट्याच्या तीन जागांवरील उमेदवारांची नावं जाहिर केली आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे हे तीन उमेदमावर भाजपने जाहीर केले आहेत. विधानपरिषदेच्या ५ जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या.

    राज्यातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या पाच जागांपैकी ३ जागा भाजप, आणि प्रत्येकी एक एक जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली होती. १० मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आणि उद्या(१७ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानुसार भाजपने आज(१६ फेब्रुवरी) आपल्या वाट्याच्या तीन जागांवरील उमेदवारांची नावं जाहिर केली आहेत.

    संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे हे तीन उमेदमावर भाजपने जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपने आपल्या उमेदवराची नावं जाहीर करुन या चर्चांना आपल्याकडून पुर्णविराम दिला.

    संदीप जोशी हे नागपुरचे महापौर राहिलेले आहेत. तर, संजय केनेकर हे भाजपचे महामंत्री आहेत. संजय केनेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये एक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष पासून ते प्रदेशाध्यक्ष असे १२ वर्ष काम केले. दादाराव केचे हे वर्धा आर्वीतून आमदार होते. ज्यांना डावलून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारली व त्या ठिकाणी आमदार सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नाराज झालेल्या दादाराव केचे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांनतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता. आता विधानपरिषदेत आपल्याला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे पत्र परिषदेत दादाराव केचे यांनी स्पष्ट केले होते.

    दरम्यान, राष्ट्रवादीच्या विधानपरिषद उमेदवाराचे नाव आज (१६ मार्च) जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंदर्भात दुपारी देवगीरी बंगल्यावर बैठक होणार आहे. झीशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे. संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रं तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

    तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवरांची संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या विधानपरिषदेसाठीच्या उमेदवाराची घोषणा ऐनवेळी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यावेळी सावध पाऊल ऊचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्कांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे. माजी नगरसेवीका शितल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरचे किरण तांडव यांचेही नाव चर्चेत आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed