Pune Burning Two Wheeler : धुळवडीच्या दिवशी मोठ्या उत्साहात असताना आरोपींनी शिबुकुमारला दारू पिण्यासाठी बोलावले. मात्र, त्याने नकार दिला व सांगितले की, त्याची पत्नी त्याला दारू पिण्याची परवानगी देत नाही. एकमेकांचे जवळचे परिचीत असल्याने आरोपींनी त्याच्यावर जोर देण्याचा प्रयत्न केला, पण शिबुकुमारने विरोध केला आणि घरात जाऊन दार बंद केले.
घटनेचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबुकुमार ठाकूर आणि आरोपी हे नात्याने एकमेकांचे परिचित आहेत. ते सर्व परराज्यातून रोजंदारीसाठी आलेले कामगार आहेत. धुळवडीच्या दिवशी मोठ्या उत्साहात असताना आरोपींनी शिबुकुमारला दारू पिण्यासाठी बोलावले. मात्र, त्याने नकार दिला व सांगितले की, त्याची पत्नी त्याला दारू पिण्याची परवानगी देत नाही. एकमेकांचे जवळचे परिचीत असल्याने आरोपींनी त्याच्यावर जोर देण्याचा प्रयत्न केला, पण शिबुकुमारने विरोध केला आणि घरात जाऊन दार बंद केले. बराचवेळ झाला तरी शिबुकुमार घराबाहेर पडला नाही. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी रागाच्या भरात त्याची दुचाकी पेटवली. या आगीत पार्किंगमधील इतर २-४ दुचाकीसुद्धा जळून खाक झाल्या. इतर दुचाकींना आग लागल्याचे पाहताच आरोपींनी तिथून पळ काढला.
ही घटना रात्री उशिरा घडली. परिसरातील लोकांनी आग पाहून मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिबुकुमार ठाकूर (वय ३०, रा. राऊत वाडी, कोथरूड) याने त्यांच्या मित्रांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कणही ठाकूर (वय २८, व्यवसाय: सुतारकाम) आणि हिरालाल शर्मा (वय २४, व्यवसाय: सुतारकाम) या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.