• Thu. Apr 24th, 2025 12:29:53 PM
    संजय राऊतांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, देशात तणाव पसरवणे हे भाजपाचे काम

    Sanjay Raut on BJP : संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. भाजपा देशात तणाव पसरवत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांबद्दल त्यांनी सरकारवर टीका केलीये.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीये. संजय राऊत म्हणाले, देशात तणाव पसरवणे भाजपाचे काम आहे. भाजपात नवहिंदुत्व सुरू झालंय. महाराष्ट्रातील मंत्री इफ्तार पार्ट्यांना विरोध करत आहेत. राज्यात दोन वर्षात ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल सरकार बोलत नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कोणीही लक्ष देत नाहीये. पाकिस्तानच्या निर्मितीवेळी काही लोकांनी अशीच स्थिती निर्माण केली होती. देशात तणाव पसरवणे हे भाजपाचे काम आहे.

    पुढे राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील हालत तुम्हीच बघा. हिंदूस्थानात हिंदू आणि मुस्लीम अशी दोन राज्य बघायला मिळत आहेत. देश विभाजणाकडे जात आहे. नेहरू म्हणाले होते की, भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. कोकणात कधीही दंगली घडल्या नव्हता. मोहन भागवत कधीही महागाई आणि बेरोजगारी यावर बोलत नाहीत. आम्ही लोकांच्या पोटावर बोलतो तुम्ही हिंदूत्वावर बोलता.
    एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते, संजय राऊतांच्या दाव्यावर पृथ्वीबाबांचे हात वर, वडेट्टीवार म्हणतात…संजय राऊत पुढे म्हणाले की, मुस्लिमांना वेगळी दुकान, इतरांना वेगळी दुकानं असं कसं चालेल. देशात तणाव पसरावा आणि दंगली व्हाव्यात ही मोदींची इच्छा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. हिंदू मुस्लिमांनी एकत्र काम करायला हवे, असे मोहन भागवत नेहमीच म्हणतात. मात्र, हे अंमलात कोण आणणार? बीजेपी तर त्यांचीच पार्टी आहे ना?. यावेळी संजय राऊत हे मोहन भागवत यांच्यावरही टीका करताना दिसले.

    हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे. दंगली घडवणे, मशिदीवर हल्ला करणे, हिंदू तरूणांची डोकी भडकवणे हेच यांचे काम आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर मात्र कोणालीही बोलायचे नसल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले. संजय राऊत यांनी काल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. ज्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापमान देखील दिसले. मात्र, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करणे टाळले.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed