Nanded BJP Legislative Council Candidature : नांदेडमध्ये राज्य विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपचे नवे – जुने आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमर राजूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राजूरकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपने राजूरकर यांना नांदेडच्या महानगर कार्याध्यक्ष पदी निवड केली. त्यातच आता राजूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहे. भाजपने तीन नावे पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली असून त्यात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची चर्चा आहे.
Nanded News : पती-पत्नीने अवघ्या दीड एकरात घेतलं ६५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन, केली लाखोंची कमाई
राजूरकरांना चव्हाणांचा पाठिंबा, परंतु देशमुख आणि कौडगे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून राजूरकर मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी यापूर्वी १२ वर्षे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले असून भविष्यात नांदेड महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या तयारीसाठी त्यांना संधी द्यावी, अशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची शिफारस आहे. परंतु, चैतन्यबापू देशमुख यांनी राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपाच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी संधीची मागणी केली आहे.
Pune News : धंगेकर अजित पवारांबद्दल बोलले अन् महायुतीत भडका उडाला, दिपक मानकरांनी सगळंच काढलं
नांदेड भाजपात जुने विरुद्ध नवे संघर्ष?
संजय कौडगे हे पक्षाचे विभागीय संघटनमंत्री असून, त्यांचे फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे तेही विधान परिषदेसाठी प्रयत्नशील आहेत. या घडामोडींमुळे नांदेड भाजपात नव्या प्रवेशकर्त्यांना संधी द्यावी की जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, यावर मतभेद दिसून येत आहेत.
Nanded News : नांदेडमध्ये भाजपात उमेदवारीवरुन जुने-नवे आमनेसामने; विधान परिषदेसाठी या तीन बड्या नावांची चर्चा
नांदेडला पुन्हा संधी मिळेल का?
गेल्या ४० वर्षांत भाजपाने नांदेडमधून विधान परिषदेसाठी केवळ राम पाटील रातोळीकर यांना २०१८ मध्ये संधी दिली होती. गेल्या वर्षभरात राज्यसभेसाठी नांदेडच्या दोन नेत्यांना संधी दिल्यानंतर, आता विधान परिषदेसाठीही नांदेडला संधी मिळेल का, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षाच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

