Amit thackeray meet Ajinkya Ghuge family – मनसे नेते अमित ठाकरेंनी अपघाती निधन झालेल्या अजिंक्य घुगे यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनाही अश्रु अनावर झाले.
https://www.instagram.com/reel/DHIlR5aIixp/?utm_source=ig_web_copy_link
पोस्ट शेअर करत दिली होती श्रध्दांजली
अजिंक्य घुगेंच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आणि अमित ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मनविसेने पोस्ट शेअर करत अजिंक्य यांना श्रध्दांजली वाहिली होती. मनविसेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांच्या अकाली आणि दुर्देवी निधनाची बातमी अतंत्य वेदनानायक आहे. अमितसाहेबांनी दिलेले अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हिंगोलीत मनविसेच्या वाढीसाठी अतुलनीय मेहनत घुगे यांनी घेतली होती. संघटना बळकट करण्यासाठी झटणारा आणि कामाचा आग्रह धरणारा उमदा सहकारी आज काळाच्या पडद्याआड गेला अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती.
कसा झाला अपघात ?
११ मार्चला रात्री ९ वाजता हिंगोली औंढा नागनाथ येथील रस्त्यावर मनविसे जिल्हाध्यक्ष घुगे यांचा अपघात झाला. ते आपल्या कारने औंढा नागनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होते. त्यावेळी अचानक कार आणि पिक अप वाहन समोरासमोर धडकले. या भीषण अपघातात २५ वर्षीय अजिंक्य यांचे जागीच निधन झाले. तर दिनेश पोले आणि निखिल पराडकर हे दोघ जण गंभीर जखमी झाले. वाहनाच्या धडकेचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी धाव घेतली आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अजिंक्य घुगे हे मनसेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचे भाचेही होते.

