Holi 2025: ११ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. अठराशे अधिकारी आणि नऊ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
हायलाइट्स:
- १,८०० अधिकारी तैनात
- ९ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी
- कायदा मोडणाऱ्यांची खैर नाही

मुंबईतील चौपाट्या, गर्दीच्या ठिकाणी विशेष गस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आले असून त्यादृष्टीने बंदोबस्तासाठी फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. मद्यपी वाहन चालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे, अमली पदार्थाची विक्री, सेवन करणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून सण जल्लोषात साजरा करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

असा असेल फौजफाटा…
■ ०७ अतिरिक्त पोलिस आयुक्त
■ १९ पोलिस उपायुक्त
■ ५१ सहायक पोलिस आयुक्त
■ १७६७ पोलिस अधिकारी
■ ९१४५ पोलिस अंमलदार
■ एसआरपीएफच्या तुकड्या
■ शीघ्र कृती दलाची पथके
■ बॉम्ब शोधक आणि नाशक पथक
■ होमगार्ड जवानांची मदत