• Fri. Sep 18th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

पुणे शिवशाही अत्याचारप्रकरणी आरोपी गाडेवर तीन कलमांनुसार गुन्हा दाखल

पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिस कोठडीत चौकशी करण्याचा अधिकार न्यायालयाने कायम ठेवला आणि त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली.आरोपी गाडेने पीडित तरुणीवर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपी गाडेवर भारतीय न्याय संहितेनुसार कलम ६४ (२) (एम), ११५ (२) आणि १२७ (२) या तीन अतिरिक्त कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed