• Sun. Apr 20th, 2025 11:07:11 PM
    माजी आमदार, जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

    Thackeray group leaders join Shinde group : गेली अडीच वर्षे महायुती सरकारने केलेल्या कामाच्या बळावर आणि लोककल्याणकारी योजनांमुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केले. त्यामुळेच आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली असून, ‘गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक’ पोहचवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिंदे यांनी केले.

    Lipi

    उमेश पंधरकर, मुंबई :- सोलापूर जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी आमदार उत्तमराव खंदारे आणि रविकांत पाटील, तसेच माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील तसेच वाशीम जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल गिरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यासोबत वाशीम जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर आणि माजी पोलीस उपअधीक्षक रायते यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच वाशीम जिल्ह्यातील ५३ सरपंच, २३ उपसरपंच आणि ६३ ग्रामपंचायत सदस्यांनीही यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना भावी वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

    paksha pravesh

    त्यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, श्रीराम महासंघाचे अध्यक्ष आकाश बेग, उबाठा गटाचे नेवासा नगरपंचायतीतील माजी नगरसेवक सचिन वडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा सरचिटणीस मनोज भिसे आणि अहिल्यानगर मधील नगरसेवक, पदाधिकारी आणि युवा अधिकाऱ्यांनाही यावेळी प्रवेश केला.

    paksha pravesh 2

    यावेळी बोलताना, गेली अडीच वर्षे महायुती सरकारने केलेल्या कामाच्या बळावर आणि लोककल्याणकारी योजनांमुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केले. त्यामुळेच आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली असून, ‘गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक’ पोहचवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिंदे यांनी केले. पक्षाने सुरू केलेल्या सदस्य नोंदणी अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेवर विश्वास ठेवून तुम्ही सर्वजण या पक्षात आलेले आहात, तुमच्या गावचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुमचे प्रश्न नक्की सोडवेन अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

    paksha pravesh3

    यावेळी आमदार भावना गवळी, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख मनीष काळजे, नाशिक जिल्हा संघटक योगेश म्हस्के आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed