धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल पंपावर धक्कादायक थरार तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला. पेट्रोल भरल्यानंतर दोन आरोपी हे पिस्तूलीचा धाक दाखवून पळून गेले. पण सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव : धाराशिवमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाशी फाट्याजवळील पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोलचे पैसे न देता पळ काढला होता. यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी घाबरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. वाशी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींचा माग काढता आला आणि त्यांना जेरबंद करता आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दोन युवक विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवर पेट्रोल पंपावर आले. त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून घेतले. पैसे मागितल्यावर त्यांनी पिस्तूलसदृश एअर गनचा धाक दाखवत तेथून पळ काढला. या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत येरमला पोलिसांच्या मदतीने वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लखन शाहू मोहिते (रा. कळमनुरी, जि. हिंगोली) आणि दिनेश भगवान चव्हाण (रा. आंबेजोगाई, जि. बीड) अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १० हजार रुपये किमतीची Hawk-Series एअर गन, ८५ हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी तसेच धारदार चाकू जप्त केला आहे.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या दोघांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का? याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा