Beed Crime: बीड जिल्ह्यात पाच वर्षांत २७६ हत्या, ७६६ हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत हत्येच्या ३६ घटनांची नोंद करण्यात आल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
हायलाइट्स:
- ७६६ हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद
- जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ३६ हत्या
- देवेंद्र फडणवीस यांची लेखी उत्तरात माहिती
देशमुख प्रकरणात ८ आरोपी अटकेत
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्येप्रकरणी ८ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू असून एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणी केज येथील पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. तर, रामपुरी येथील बालाजी घरबुडे आणि परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू असल्याचेही सांगितले.
‘प्रकल्प वेळेत पूर्ण करा’
मुंबई : मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे एक लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा आढावा घेताना, ‘प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेग वाढवा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

